Comprehension: | ||
पुढील उतारावाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. उद्याने ही लंडनचे वैभव आहे. लंडनमध्ये कुठेही राहणाऱ्या नागरिकाच्या पायी चालण्याच्या वाटेत कुठले ना कुठले उद्यान आहे. लंडनमधली 45000 एकर जमीन बागांनी सजलेली आहे. त्यातील 6000 एकरांवर राजघराण्याच्या दहा बागा आहेत. आज जरी राणी त्यांची देखभाल करीत नसली तरी शासन त्या बागा सांभाळते; आणि असे असूनही त्यांचे राजवैभव मुळीच उतरणीला लागलेले नाही. त्या विस्तीर्ण आणि रमणीय आहेत. त्यांच्या हिरव्यागार चढ-उतारांवरून पायी फिरण्याचे आणि मधूनच दृष्टीस पडणारे रंगीत फुलांचे ताटवे न्याहाळण्याचे सुख हे प्रत्यक्ष अनुभवल्यावरच समजते. लंडनमधील बागांना जो कंटाळला तो आयुष्याला कंटाळला असे म्हणतात. | ||
SubQuestion No : 14 | ||
Q.14 | ‘सुंदर’ या अर्थी उताऱ्यात कोणता शब्द वापरला आहे? | |
Ans | 1. विस्तीर्ण | |
2. रमणीय | ||
3. ताटवे | ||
4. देखभाल |
Correct Ans: 2