Comprehension: | ||
पुढील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. ‘रोजगाराभिमुख शिक्षण’ या संकल्पनेला येत असलेले महत्त्व भाषाशिक्षण देतानाही विचारात घ्यावे लागेल. महाविद्यालयीन पातळीवर मराठी शिकविताना अभ्यासक्रमात त्यादृष्टीने बदल करावे लागतील. आता काळाची पावले ओळखली पाहिजेत. जिथे काही आशा आणि जिथे काही तरी संधी उपलब्ध होतील, अशा अभ्यासक्रमांकडे ओढा वाढता राहील; हे स्वाभाविकच आहे. या उलट, परंपरानिष्ठा, जुनाट, तोच तो अभ्यासक्रम जर असेल तर मग शिकायचे कशासाठी?’ या प्रकारची मानसिकता डोके वर काढणे स्वाभाविक ठरते. विद्यापीठांमध्ये स्नातकोत्तर चालणारे मराठी विषयांचे अभ्यासक्रम आणि या अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थी यांची स्थिती अर्थात फार बरी नाही. जर ही स्थिती अशीच राहिली तर उद्या भविष्यात विद्यार्थी नाहीत म्हणून विभाग गुंडाळून ठेवण्याची भीती वाढू शकते किंवा आंतरविद्याशाखा पद्धती अवलंबून असे विभाग इतर विभागांना जोडून देत डबघाईला आलेल्या विषयांचा ‘श्वास’ सुरू ठेवला जाऊ शकतो. या धोक्याचा गंभीरतेने विचार करायला हवा. आधी कारणांच्या मुळाशी जायला हवे. मराठी विषयाचे अभ्यासक्रम बरेचसे साचेबद्ध झाले आहेत. त्यात व्यापक बदल व्हायला हवेत. विद्यार्थी गरजा आणि रोजगारांच्या संधी यांचा विचार अभ्यासक्रमात आग्रहपूर्वक करायला हवा. वर्तमानाचा सूरही समजून घेता यायला हवा. केवळ साहित्य प्रकारांचा विचार करून किंवा साहित्येतिहासांचे पठण करून विद्यापीठाची मराठी टिकून राहील, याची मुळीच शक्यता नाही. मराठीतील संशोधनाचा दर्जाही फार गुणग्राहक दिसत नाही. दिवसेंदिवस त्याचेही स्वरूप पुष्कळच खाली खाली चालले, हे अमान्य करता येत नाही. भाषाविज्ञानावर शेकड्यात एखादा प्रबंध आढळतो. तेव्हा हे असे का? समाजसुधारक किंवा संत यांच्या साहित्याचा भाषिक पातळीवरून शोध घेत असा अभ्यास कितपत व किती केला जातो? किंवा नंदा खरे यांच्यासारखे अनेक लेखक, ज्यांनी मराठी साहित्यात वेगळे अनुभवविश्व, माणसे, शिवाय स्थापत्य क्षेत्रातील नवी सशक्त भाषा साहित्यात आणली; अशा नंदा खरे यांच्या साहित्याला मराठीच्या अभ्यासक्रमांमध्ये आपण जागाही देत नाही. अशा लेखनावर संशोधन, समीक्षाही होत नाही. आमच्या अभ्यासक्रमांच्या आणि संशोधनाच्या एकूण शोधमोहिमा एवढ्या का भरकटत चालल्या आहेत, याचाही जरूर करायला हवा. | ||
SubQuestion No : 13 | ||
Q.13 | आजकाल कोणत्या संकल्पनेला महत्त्व प्राप्त झाले आहे? | |
Ans | 1. बाल शिक्षण | |
2. रोजगाराभिमुख शिक्षण | ||
3. आरोग्य शिक्षण | ||
4. कृषी शिक्षण |
Correct Ans Provided: 2