| Comprehension: | ||
| दिलेला उतारा वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. मेघांनी आकाश भरलेले असले म्हणजे लांबवर पाहिले की ढग कोणते आणि शिखरे कोणती हे ओळखता येत नाही. जरा तीक्ष्ण नजरेने पाहिल्यास चंद्रावरील काळ्या डागांप्रमाणे ढगांच्या पडद्यातून या पर्वतांच्या अस्पष्ट रेषा दिसतात. काळ्या मेघांना त्यांच्या कडांची किनार जोडल्यासारखी दिसते. लहान ढग तर या गिरिराजांच्या अंगा-खांद्यावर नित्य खेळत असतात. वनराजांच्या अंगावर उंदराने बागडावे तसे ! चांदण्या रात्री ही हिमगिरीची रांग क्षितिजावर दिसणाऱ्या आकाशगंगेसारखी भासते. सकाळी पूर्वेकडील महादेव पर्वतरांगा सूर्यकिरणांनी चमचमताना दिसते. त्याच्या शिखरावरील बर्फाचे अस्तित्व ऋषिमुनींच्या पिंजारलेल्या जटाप्रमाणे वाटते. बहुतेक शिखरांवर पडलेले बर्फ उन्हाळ्यात सुद्धा शाबूत असते. हरमुख गंगा या पर्वताच्या शिखरावरसुद्धा उन्हाळ्यात कधीकधी बर्फ पडते. | ||
| SubQuestion No : 13 | ||
| Q.13 | सिंह या अर्थी उताऱ्यात वापरलेला शब्द सांगा. | |
| Ans | 1. वनराज | |
| 2. हिमगिरी | ||
| 3. गिरिराज | ||
| 4. आकाशगंगा | ||
Correct Ans Provided: 1