| Comprehension: | ||
| दिलेला उतारा वाचा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये संतांना सागराची उपमा दिली आहे. त्यांनी संतांना अर्णव असे संबोधले आहे. समुद्र आपली जागा सोडू शकत नाही, पण संत मात्र कुठेही जाऊ शकतात. समुद्र मंथनातून अमृताबरोबर विषही बाहेर पडले, पण संतांना कितीही त्रास दिला तरी त्यांच्या तोंडून अपशब्द निघत नाहीत. ज्ञानदेवांनी सुद्धा त्यांच्या मातापित्यांना, भावंडांना त्रास देणाऱ्याविषयी कुठेच अपशब्द उच्चारले नाहीत. हेच संतांचे वैशिष्ट्य आहे. दुःख देणाऱ्याचेही त्यांच्या संगतीने कल्याणच होते. त्यामुळे ते कल्पतरूच होत. वाल्या कोळी एक लुटारू होता, पण नारद मुनींच्या सहवासात आल्यानंतर त्याचा वाल्मिकी ऋषी झाला,आणि तो अलौकिक अशा रामायणाचा कर्ता झाला. वाल्याने त्यांना बांधून ठेवले, त्यांच्यावर कुऱ्हाड उगारली. तरीही ते शांत राहून त्याला कल्याणकारी उपदेश करत राहिले. वाल्या कोळ्याला आपले जीवन कृतार्थ करण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश दाखवला . | ||
| SubQuestion No : 19 | ||
| Q.19 | वाल्मिकीच्या ग्रंथाचे नाव काय? | |
| Ans | 1. महाभारत | |
| 2. रामायण | ||
| 3. ज्ञानेश्वरी | ||
| 4. रघुवंश | ||
Correct Ans Provided: 2