| Comprehension: | ||
| खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जगतात माझ्या वडिलांसारखे व्हायचा, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे जायचा प्रयत्न केला. त्यांनी मला सांगितलेली मूलभूत सत्ये समजून घेण्याचा, आचरणात आणण्याचा मी सतत प्रयत्न करीत राहिलो. त्यांच्या शिकवणीमुळे मला एक विश्वास वाटत राहिला आहे. प्रत्येकामध्ये एक दैवी प्रकाशाची ज्योत तेवत असते. दु:ख, अपयश, निराशेच्या अंधारात ती वाट दाखवू शकते. तुम्हाला योग्य जागी पोचण्यासाठी मार्गदर्शन करते. एकदा का त्या देवत्वाशी, त्या ज्योतीशी तुमचे अनुबंध जुळले; तर तुम्ही मुक्तीच्या, आनंदाच्या, मन:शांतीच्या वाटेवरचे कायमचे प्रवासी होता. मी दहा वर्षांचा होतो, तेव्हा माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले. या प्राचीन तीर्थक्षेत्रावर येणा-या प्रवासी भक्तांना रामेश्वरमपासून धनुष्कोडीपर्यंत नेण्या-आणण्यासाठी तिचा उपयोग ते करणार होते. धनुष्कोडीला स्थानिक भाषेत सेतुक्करायी म्हणतात. एक दिवस भयानक चक्रीवादळाने किना-याला झोडपून काढले. ताशी शंभराहून अधिक मैलांच्या वेगाने वाहणा-या सुसाट वा-याने सेतुक्करायीची थोडीफार जमीन अन आमची बोट समुद्रार्पण केली. तो पर्यंत मी समुद्रांच फक्त सौंदर्य पाहिले होते. त्या प्रसंगात प्रथमच त्याचे रौद्र रूप, त्याची संहारक शक्ती यांचे मला दर्शन झाले. | ||
| SubQuestion No : 49 | ||
| Q.49 | कोणाच्या शिकवणीमुळे निवेदकाला विश्वास वाटत असे? | |
| Ans | 1. वडील | |
| 2. प्रकाशज्योत | ||
| 3. समुद्र | ||
| 4. देव | ||
Correct Ans Provided: 1