| Comprehension: | ||
| खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. महाराष्ट्रात प्रतिभावंत चित्रकार-शिल्पकारांची मोठी परंपरा आहे. पण चित्रकार आणि दृश्यकलेवरील लेखन दोन्हीही सारख्याच ताकदीने करणारे फारच थोडे. यासोबतच आपण ज्या दृश्यपरंपरेत वाढलो त्याचे आणि समाजाचं काही देणे लागतो याचे भान असलेले आणि स्वनिरपेक्ष कृती करणारे आणखी दुर्मिळ. अशा दुर्मिळ चित्रकार-अभ्यासक-संयोजकांमध्ये बहुळकरांचा समावेश होतो. कलावंताला त्याला पाहिजे तशा कोणत्याही विषयावर काम करण्याचे स्वातंत्र्य असते. पण कलेच्या अभ्यासकाला साऱ्या कलाप्रवाहांकडे आपले पूर्वग्रह दूर ठेवून समग्रपणे पाहावे लागते. बहुळकर बॉम्बे स्कूलच्या यथार्थवादी परंपरेतील आणि त्याचाच भाग असलेल्या बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल चळवळीबद्दल आत्मीयता असलेले चित्रकार. पण भारतीय कलेतील यथार्थवादी, आधुनिक, अमूर्त, उत्तर आधुनिक आणि लोककला अशा सर्व कलाप्रवाहांचा समन्वय साधण्याचा त्यांच्या लेखनातून त्यांनी प्रयत्न केला. हे कलासंचित सामान्य जनांपर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे, हे त्यांनी सातत्याने पाहिले. 10 ऑक्टोबर 1954 मध्ये जन्मलेल्या सुहास बहुळकर यांचे शालेय शिक्षण पुण्यातच झाले. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये 1970 मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि 1975 मध्ये फाइन आर्टमधील पदविका पहिल्या वर्गात प्राप्त केली. चित्रकार म्हणून त्यांची जडणघडण बालवयातच सुरू झाली होती. बहुळकरांचे भाग्य असे की ज्या काळात मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलाने चित्रकार म्हणून करिअर करावी याबद्दल नाखूश असत. त्या काळात त्यांचे वडील वसंत बहुळकर यांनी मुलाची चित्रकलेची आवड लक्षात घेऊन बहुळकरांमधील चित्रकार जोपासण्याचा आणि वाढवण्याचा ध्यास घेतला. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्यांना बालवयातच बालचित्रकार म्हणून प्रसिद्धी मिळाली. चित्रकाराच्या हस्तकौशल्याबरोबरच त्याची मर्मदृष्टी विकसित झाली पाहिजे हे वडिलांनी ओळखले होते. त्यानुसार त्यांनी एस. एल. हळदणकरांपासून प्रफुल्ला डहाणूकरांपर्यंत अनेक मान्यवर चित्रकारांकडे जाऊन त्यांच्या भेटी घडवून आणल्या. यामुळे जे. जे. मध्ये प्रवेश घ्यायच्या वेळीच बहुळकर यांची पूर्वतयारी झालेली होती. | ||
| SubQuestion No : 47 | ||
| Q.47 | ______ला प्रतिभावंत चित्रकार-शिल्पकारांची मोठी परंपरा आहे. | |
| Ans | 1. महाराष्ट्राला | |
| 2. गोव्याला | ||
| 3. कर्नाटकाला | ||
| 4. तामिळनाडू | ||
Correct Ans Provided: 1