| Comprehension: | ||
| खालील परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. इंग्लंड देश स्वत:ला आधुनिक राष्ट्र संकल्पनेचा उद्गाता समजतो. फ्रेंच राज्यक्रांती आणि नेपोलियनच्या युध्दानंतर ‘राष्ट्र’ ‘राष्ट्रवाद’ आदी विषयांचा प्रारंभ झाला असे काही विद्वानांचे मत. युरोपचा इतिहास बघितला तर राष्ट्रीय भावनेच्या संकल्पनेस मुख्यत्वे दुसऱ्या देशांशी युद्ध खेळताना अधिक बळ मिळाले. हन्टिग्टनच्या मताप्रमाणे युद्धे, राज्य तयार करतात आणि त्यातून राष्ट्रे निर्माण होतात. मायकेल हावर्ड म्हणतो की, ‘‘कोणतेही राष्ट्र खऱ्या अर्थाने युद्धाशिवाय निर्माण होऊ शकत नाही.’’ राष्ट्रीय भाषा, साहित्य, न्यायव्यवस्था, प्रतिनिधी सरकार, विदेशी व्यापार, युद्ध, शांती इ. तत्त्वांनी राष्ट्रीय भावनांना हळूहळू प्रोत्साहन दिले. पुढे औद्योगिक क्रांतीने यांस अधिक गती मिळाली. रवींद्रनाथ ठाकूर यांनी विदेशात प्रवास केला त्यावेळी ‘राष्ट्र’ ही संकल्पना अन्य ठिकाणी कशी आहे, यावर भाष्य केले आहे. ते लिहितात, ‘पश्चिमेत ‘राष्ट्र’ या संकल्पनेचा झालेला विकास भारतापासून भिन्न आहे. प्राचीन काळी तिथे प्राथमिक गरजांच्या पूर्ततेसाठी माणसांचे कबिले संघर्ष करत फिरत होते. कबिल्याची एक बोली भाषा विकसित झाली. कबिल्याचे नेतृत्व निर्माण झाले. या नेतृत्वाने आपल्या समूहाची राखण करण्यासाठी हळूहळू सेना तयार केली. शांती स्थापनेसाठी काही नियम, कायदे बनविण्यात आले. प्रशासन अस्तित्वात आले. अधिकाधिक लूट करता यावी म्हणून हे कबिले संघटित राहू लागले. अधिकाधिक शक्ती-अधिकाधिक लूट- अधिक उपभोग हे त्यांचे सूत्र राहिले. हे कबिले जिथे-जिथे स्थायिक झाले तिथे कालांतराने त्याची पृथक-पृथक राज्ये होत गेली. एक जात – एक भाषा – एक संप्रदाय हेच, त्यांचे राज्य आणि राष्ट्र यांचा आधार बनत गेले. त्यांची राष्ट्राच्या विकासाची ही कल्पना आहे. | ||
| SubQuestion No : 48 | ||
| Q.48 | _______ देश स्वत:ला राष्ट्र संकल्पनेचा उद्गाता समजतो. | |
| Ans | 1. भारत | |
| 2. इंग्लंड | ||
| 3. जपान | ||
| 4. अमेरिका | ||
Correct Ans Provided: 2